आयपीएलचं अकरावं सत्र सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला एक मोठा धक्का बसला आहे. न्युझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पुढचे ९ महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीये. सँटनरच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही तो खेळू शकणार नाहीये.
अवश्य वाचा – IPL 2018 – मुंबईकर अमोल मुझुमदार राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक
सँटनरच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी फिरकीपटू टॉड अॅस्टलला संघात जागा दिली आहे. सँटनर हा संघाचा महत्वाचा भाग होता, त्याचं संघात असणं हे आमच्यासाठी फायदेशीर होतं. मात्र त्याला सध्या जी दुखापत झाली आहे ती पाहता त्याच्यावर योग्य वेळी शस्त्रक्रिया होणं गरजेचं असल्याचं न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी म्हटलं आहे. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पुढीलप्रमाणे –
केन विलियमसन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, जीत रावल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वेंगर, बी. जे. वॉटलिंग
अवश्य वाचा – ये देश हे शेर जवानोंका….,आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं अँथम ऐकलत का?