दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर नवीन हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने एरिक सिमन्स यांना गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात दाखल करुन घेतलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ व्यवस्थापनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू असलेल्या सिमन्स यांनी याआधी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. २०११ च्या विश्वविजेच्या भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही सिमन्स होते. याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स आणि पुजे सुपरजाएंट या संघांना मार्गदर्श करण्याचा सिमन्स यांच्याकडे अनुभव आहे. चेन्नईने याआधीच लक्ष्मीपती बालाजी याला संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नेमलं आहे.

७ एप्रिलपासून आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वाचे विजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची सामना वानखेडे मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे नवीन हंगामात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader