आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणारा गौतम गंभीर दिल्लीचं नेतृत्व करणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व केल्यानंतर नवीन हंगामात गौतम आपल्या घरच्या संघात परतला आहे. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी दिल्ली डेअरडेविल्सने गौतम गंभीरला २.८० लाखांची बोली लावत विकत घेतलं.

अवश्य वाचा – IPL संघांचे मालक आणि खेळाडुंकडून जास्त टॅक्स घ्या; भाजप खासदाराची मागणी

अकराव्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटींगची दिल्लीच्या प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. रिकी पाँटींगने दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीर अकराव्या हंगामात दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. “गौतमने कोलकात्याचं नेतृत्व करताना आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकात्याने स्पर्धेचं विजेतेपद पटकावून अनेकदा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना हरवलं आहे. त्यामुळे अकराव्या हंगामाआधी त्याने आमच्याकडे दिल्लीमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चर्चा करुन आम्ही संघाचं नेतृत्व गौतम गंभीरकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.” पहिल्या दिवसाचा लिलाव संपल्यानंतर रिकी पाँटींग पत्रकारांशी बोलत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत गौतम गंभीर दिल्लीच्या टी-२० संघात सहभागी होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीने राजस्थानवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ३६ वर्षीय गौतम गंभीर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे नवीन हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.