आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने झिम्बाब्वेची माजी कर्णधार हिथ स्ट्रिक याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. आयपीएलच्या मागच्या दोन पर्वांमध्ये स्ट्रिक गुजरात लायन्स या संघाचा प्रशिक्षक होता. सध्या हिथ स्ट्रिक झिम्बाब्वेच्या संघाचा प्रशिक्षक असून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणाचा मोठा अनुभव स्ट्रिककडे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिज आणि मार्गदर्शक सायमन कॅटीच यांच्यानंतर स्ट्रिक हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी झालेला तिसरा सदस्य ठरला आहे. हिथ स्ट्रिक लक्ष्मीपती बालाजीच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिककडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. त्यामुळे नवीन खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गासह हा संघ आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 heath streak appoint as a bowling coach of kkr