कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुखापतग्रस्त मिचेल स्टार्कऐवजी संघात पर्याय शोधला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज टॉम कुरनला कोलकाता नाईट रायडर्स संघात जागा देण्यात आलेली आहे. अकराव्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कवर ९.४ कोटींची बोली लावली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान स्टार्कच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला आयपीएलवर पाणी सोडावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ वर्षीय टॉम कुरनने जून २०१७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केलं. आतापर्यंत कुरनने तिन्ही प्रकारांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कुरनच्या खात्यावर अवघ्या सात विकेट जमा असल्या तरीही शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करण्यासाठी कुरन ओळखला जातो.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 kkr announced replacement of mitchell starc tom curran will play from kkr