आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्यासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना, कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कोलकात्याच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र मानलं जाणाऱ्या मिचेल स्टार्कला उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार असल्याचं समजतंय. मिचेल स्टार्कवर कोलकाता नाईट रायडर्सने अकराव्या हंगामासाठी तब्बल ९.४ कोटींची बोली लावली होती.
अवश्य वाचा – IPL 2018 – राजस्थान रॉयल्स संघात ‘हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा
मिचेल स्टार्कच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचं समजतंय. पुढील उपचारासाठी स्टार्क मायदेशी परतणार असल्याचं कळतंय. अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणार आहे. त्यामुळे मिचेल स्टार्कच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्ज बद्दल बोलताना महेंद्रसिंह धोनी का झाला भावुक?