सर्व आपीएल संघांनी २०१८च्या नव्या सीझनसाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खेळाडूंची ही यादी जाहीर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.
Virat Kohli, AB De Villers and Sarfaraz Khan have been retained by Royal Challengers Bengaluru. Rohit Sharma, Hardik Pandya and Jasprit Bumrah retained by Mumbai Indians #IPLRetention
— ANI (@ANI) January 4, 2018
आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवले आहे.
#IPLRetention Gautam Gambhir released by Kolkata Knight Riders
— ANI (@ANI) January 4, 2018
चेन्नई, बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Here is the complete list of the retained players#IPLRetention
Read: https://t.co/caf3Kj81T2 pic.twitter.com/SdRYrUHfpX
— CricketNDTV (@CricketNDTV) January 4, 2018
आठही संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी :
१. रॉयल चैलेंजर्स बेंगलुरू : विराट कोहली, ए. बी. डिविलियर्स, सरफराज खान
२. चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
३. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या
४. दिल्ली डेयरडेविल्स : क्रिस मॉरिस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर
५. कोलकाता नाइटराइडर्स : सुनील नरेन, आंद्रे रसेल
६. सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार
७. राजस्थान रॉयल्स : स्टीव स्मिथ
८. किंग्स इलेवन पंजाब : अक्षर पटेल</p>