डेव्हिड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. उपलब्ध खेळाडूंच्या यादीतून हैदराबादने १ कोटी रुपयांची किंमत मोजत हेल्सला वॉर्नच्या जागी पर्याय म्हणून संघात दाखल करुन घेतलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर वॉर्नरने हैदराबादच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता.
अवश्य वाचा – कसोटी क्रिकेटसाठी श्रीलंकन खेळाडूने नाकारली आयपीएलची ऑफर, हैदराबादकडून खेळण्यास दिला नकार
सनराईजर्स हैदराबाद संघाने अॅलेक्स हेल्सच्या निवडीची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितली आहे.
Breaking news: Alex Hales, the hard hitting English batsman has joined the #OrangeArmy ! pic.twitter.com/6j4kuSCuXa
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 31, 2018
याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. वॉर्नरसोबत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
अवश्य वाचा – आयपीएलमध्ये बोली नाही, भारताचा ‘हा’ खेळाडू आता प्रशिक्षकाची भूमिका बजावणार