आयपीएलच्या बाराव्या हंगामात, राजस्थान रॉयल्सच्या उरलेल्या सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेच पुन्हा एकदा कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या व्यवस्थापनाने अजिंक्यला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं करत स्टिव्ह स्मिथला कर्णधार केलं होतं. मात्र आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात ठेवत स्मिथ आपल्या मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत रहाणे उर्वरित सामन्यांत पुन्हा एकदा राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. शनिवारी राजस्थानचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळेल.

राजस्थानचा संघ सध्या ११ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. बाद फेरी गाठण्यासाठी राजस्थानच्या संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवत इतर संघातील सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळे अजिंक्य आपल्या संघाला बाद फेरीपर्यंत पोहचवू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : बाद फेरीत पोहचलेल्या दिल्लीला धक्का, कगिसो रबाडा स्पर्धेबाहेर

Story img Loader