आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध मुंबईला पराभव स्विकारावा लागला. त्यातच पहिल्या सामन्याआधी न्यूझीलंडचा अडम मिलने दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच मार सहन करावा लागला. मिलनेच्या जागी मुंबई इंडियन्सने विंडीजच्या अल्झारी जोसेफला संघात स्थान दिलं आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या स्थानिक वन-डे स्पर्धेसाठी लसिथ मलिंगा आयपीएलचे पहिले ६ सामने खेळू शकणार नव्हता. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने परवानगी दिल्यामुळे मलिंगा आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानावर उतरु शकला नाही. त्याच्या दुखापतीबद्दल संभ्रम असताना, बंगळुरुविरुद्ध सामन्यात मुंबईला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader