किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन आश्विनला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकाऱ्यांनी आश्विनला १२ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शनिवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबवर ५ गडी राखून मात केली. याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेलाही अशाच प्रकारे दंडाच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं.

दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभवाचा धक्का दिला. पंजाबने दिलेलं १६४ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांनी ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शिखर धवनने ५६ तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ५८ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – IPL 2019 : दिल्लीच्या विजयात ‘गब्बर’ ठरला चौकारांचा बादशहा

Story img Loader