आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठीचा लिलाव आज जयपूरमध्ये पार पडला. अनपेक्षितपणे या लिलावावर गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळाला. गतवर्षीप्रमाणे जयदेव उनाडकटनेही या हंगामात ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही याच रकमेची बोली मिळवत जयदेवशी बरोबरी साधली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये १८ वर्षीय प्रभसिमरन सिंहला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी संघमालकांमध्ये चढाओढ लागली होती. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी ८० लाखांची बोली लावत प्रभसिमरनला आपल्या संघात दाखल करुन घेतलं.
Brrrrrrruuuaaaaaa!
Welcome to the squad, Prabhsimran!#KXIP #LivePunjabiPlayPunjabi #SaddaSquad #IPLAuction pic.twitter.com/YT50kIqZEU— Kings XI Punjab (@lionsdenkxip) December 18, 2018
१८ वर्षीय प्रभसिमरन सिंह हा १९ वर्षाखालील आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. पंजाबमधील २३ वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा स्पर्धेत खेळत असताना प्रभसिमरनने २९८ धावांची खेळीही केली होती. त्याच्या या कामगिरीवर नजर ठेऊनच पंजाबच्या संघव्यवस्थापनाने त्याला यंदा ४ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजत आपल्या संघात घेतलं आहे.