गेले काही वर्ष भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंहची आज आयपीएलमधून गच्छंती होता होता वाचली आहे. पहिल्या सत्रात कोणत्याही संघाने बोली न लावल्यामुळे न विकल्या गेलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं आहे. युवराजने आपली मूळ किंमत २ कोटींवरुन १ कोटीवर आणल्यानंतर मुंबईने युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. मागचा हंगाम पंजाबकडून खेळणाऱ्या युवराजला आपल्या कामगिरीत फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याचं आव्हान युवराजसमोर असणार आहे.
NEW SIGNING
आणखी वाचाYuvraj Singh
Price: ₹ 1 Crore #CricketMeriJaan #IPLAuction— Mumbai Indians (@mipaltan) December 18, 2018
आयपीएलच्या बाराव्या हंगामात, गोलंदाजांनी आपला वरचष्मा गाजवला आहे. गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत आलेल्या जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने ८ कोटी ४० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात कायम राखलं आहे. याचसोबत मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी ८० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामात खेळाडूच्या रुपात मुंबईच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. वरुण अॅरोनला राजस्थान रॉयल्सने २ कोटी ४० लाख तर मोहीत शर्माला चेन्नईने ५ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. याचसोबत तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही अनपेक्षितपणे ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने वरुणवर ८ कोटी ४० लाखांची बोली लावली. परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या सॅम करनला सर्वाधिक बोली लागली. पंजाबच्याच संघाने करनवर ७ कोटी २० लाख बोली लावलसी
त्याआधी सुरुवातीच्या सत्रात विंडीजच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखलं आहे. विंडीजचे शेमरॉन हेटमायर, कार्लोस ब्रेथवेट आणि निकोलस पुरन यांच्यावर संघमालकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. तुलनेने भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात आपली छाप पाडता आली नाही. आपली मुळ किंमत १ कोटी रुपयापर्यंत खाली आणुनही युवराज सिंहला संघात घेण्यात कोणत्याही मालकाने उत्सुकता दाखवलेली नाहीये. भारताच्या हनुमा विहारी आणि अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुक्रमे २ कोटी आणि ५ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
शिमरॉन हेटमायरला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटला ५ कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने तर यष्टीरक्षक निकोलस पुरनला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं आहे. याव्यतिरीक्त लॉकी फर्ग्युनस १ कोटी ६० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून, विंडीजचा शेर्फेन रुदफोर्ड २ कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.
लोकसत्ताच्या लाईव्ह अपडेट्सला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
मननवर २० लाखांची बोली
अॅश्टन टर्नर ५० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघाकडून खेळणार
रियान परागही २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून
२० लाखांच्या बोलीवर खेळणार कोलकाता संघाकडून
बंडारुवर २० लाखांची बोली
कोलकाता नाईट रायडर्स संघाने घेतलं विकत
शुभमवर २० लाखांची बोली
ऋतुराजवर २० लाखांची बोली
आश्विनवर २० लाखांची बोली
सक्सेनावर २० लाखांची बोली
अक्षदीपवर ३ कोटी ६० लाखांची बोली
१ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
IPL Auction 2019: युवराज झाला ‘मुंबईकर’! १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार
१ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
पंजाबची अग्निवेशवर २० लाखांची बोली
हरप्रीत ब्रारही २० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाकडे
प्रयासवर १ कोटी ५० लाखांची बोली
पृथ्वीराजवर २० लाखांची बोली
किमो पॉलवर ५० लाखांची बोली
लियावर ५० लाखांची बोली
मुंबईकडून २० लाखांची बोली
प्रभसिमरनवर ४ कोटी ८० लाखांची बोली
शशांकवर ३० लाखांची बोली
दर्शनवर ३० लाखांची बोली
मिलींदवर २० लाखांची बोली
पंकजवर २० लाखांची बोली
अर्शदीपवर २० लाखांची बोली
नाईकवर २० लाखांची बोली
६५ लाखांची बोली
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
थॉमस नवीन हंगाम राजस्थानकडून खेळणार
कोलकात्याने २० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात
रुदफोर्डवर २ कोटींची बोली
फर्ग्युसन कोलकात्याकडून खेळणार
३ कोटी ४० लाखांच्या बोलीवर सरन मुंबईच्या संघात
५० लाखांच्या बोलीवर क्लासेन बंगळुरु संघाकडे
रहीम पहिल्या फेरीत अनसोल्ड, दुसऱ्या फेरीत रहीमवर बोली लागण्याची शक्यता
करनवर ७ कोटी २० लाखांची बोली
दुसऱ्या फेरीत अँडरसनवर बोली लागण्याची शक्यता
पहिल्या फेरीत आमलावरही बोली नाही
पहिल्या फेरीत मार्शवर बोली नाही
६ कोटी ४० लाखांची लावली बोली
पहिल्या फेरीत ख्वाजावर बोली नाही