2019 साली होणाऱ्या आयपीएलचा लिलाव डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. त्याआधी सर्व संघमालकांना Retaintion Policy नुसार खेळाडूंची देवाण-घेवाण करण्याची मूभा देण्यात आली होती. 15 नोव्हेंबर ही देवाण-घेवाणीची अखेरची तारीख देण्यात आलेली आहे. गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने यंदा आपल्या 25 सदस्यांच्या संघातून इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड, क्षितिज शर्मा आणि कनिष्क सेठ यांना करारमुक्त केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चेन्नई सुपरकिंग्जने याची माहिती दिली आहे.

गतवर्षी केदार जाधव जायबंदी झाल्यानंतर पर्याय म्हणून संघात घेतलेल्या डेव्हीड विलीला चेन्नईने संघात कायम राखलं आहे. 17 आणि 18 डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Story img Loader