आयपीएलच्या बाराव्या हंगामात, कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सनराईजर्स हैदराबाद संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कोलकात्याला विजयासाठी दिलेलं 182 धावांचं आव्हान, कोलकात्याने आंद्रे रसेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने आक्रमक 85 धावा केल्या. या सामन्यात हैदराबादला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरीही वॉर्नरने, मुंबईच्या रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. सध्याच्या घडीला वॉर्नर 762 धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
कोलकात्याविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज पुढीलप्रमाणे –
डेव्हिड वॉर्नर – 762 धावा (सनराईजर्स हैदराबाद)
रोहित शर्मा – 757 धावा (मुंबई इंडियन्स)
सुरेश रैना – 746 धावा (चेन्नई सुपरकिंग्ज)
ख्रिस गेल – 615 धावा (किंग्ज इलेव्हन पंजाब)
शिखर धवन – 543 धावा (दिल्ली कॅपिटल्स)
अवश्य वाचा – IPL 2019 : बॉल टॅम्परिंगचा डाग धुवून काढत वॉर्नरचं दमदार पुनरागमन
दरम्यान हैदराबादने दिलेलं, १८२ धावांचे आव्हान पार करताना आंद्रे रसलने वादळी खेळी करत १९ चेंडूत ४९ धावा केल्या. तसेच नितीश राणाने अर्धशतकी खेळी केली. या खेळींच्या जोरावर KKR ने आपल्या हंगामाची विजयी सुरुवात केली.