आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात, रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीदरम्यान ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो आठवा फलंदाज ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्विंटन डी-कॉकच्या साथीने रोहित शर्माने मुंबईला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्याने २२ चेंडूत ३० धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यानच रोहितने ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

या कामगिरीसह रोहितने ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्युलम, कायरन पोलार्ड, शोएब मलिक, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना आणि विराट कोहली या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

Story img Loader