आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफच्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. चेन्नईनंतर प्ले-ऑफच्या गटात पोहचलेला दिल्ली या हंगामातला दुसरा संघ आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगली टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी बाजी मारत दिल्लीने आपलं प्ले-ऑफमधलं स्थान पक्क केलं आहे. बंगळुरुचा संघ १७१ धावांपर्यंत मजल मारु शकला.
विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकात गुरकिरत मान आणि मार्कस स्टॉयनीस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने २ तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, शिखर धवन-कर्णधार श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि तळातल्या फळीत शेरफन रुदरफोर्ड आणि अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्स संघाने १८७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या षटकांत बंगळुरुने पुनरागमन करत दिल्लीच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र अखेरच्या षटकात रुरदफोर्डने फटकेबाजी करत दिल्लीला आव्हानात्मक लक्ष्य गाठून दिलं.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आजच्या सामन्यातही फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. उमेश यादवने त्याला माघारी धाडलं. मात्र यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अर्धशतक झळकावल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर तात्काळ माघारी परतले.
यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुशष लावत बंगळुरुने सामन्यात पुनरागमन केलं होतं. मात्र अखेरच्या षटकांत रुदरफोर्ड आणि पटेलने फटकेबाजी करत संघाला १८७ धावांचा पल्ला गाठून दिला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने २, तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
Highlights
डिवà¥à¤¹à¥€à¤²à¤¿à¤¯à¤°à¥à¤¸ माघारी, बंगळà¥à¤°à¥à¤²à¤¾ तिसरा धकà¥à¤•ा
????????????? ?????????? ?????????? ????? ?????? ????? ???
पाठोपाठविराट कोहलीही माघारी, बंगळà¥à¤°à¥à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•ा
????? ?????? ????? ???, ????????? ?? ?????? ?? ????
शà¥à¤°à¥‡à¤¯à¤¸ अयà¥à¤¯à¤° माघारी, दिलà¥à¤²à¥€à¤²à¤¾ चौथा धकà¥à¤•ा
????????? ??????? ????? ???
दिलà¥à¤²à¥€à¤²à¤¾ तिसरा धकà¥à¤•ा, ऋषठपंत माघारी
??????? ??????? ?????? ??????? ?????? ????????? ???????
शिखर धवनचं अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
???????? ??????? ??? ??????????? ?????
१६ धावांनी बंगळुरुवर केली मात, प्ले-ऑफच्या गटात मिळवलं स्थान
कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल
इशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने घेतला बळी
गुरकिरतची एकाकी झुंज
अमित मिश्राने घेतला बळी
अमित मिश्रांच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतने घेतला झेल
रुदरफोर्डच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर अक्षर पटेलने घेतला झेल
अक्षर पटेलने घेतला बळी, कोहलीच्या १७ चेंडूत २३ धावा
कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर पटेल झेलबाद
मात्र विराट कोहलीच्या साथीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
दिल्लीची १८७ धावांपर्यंत मजल, बंगळुरुला विजयासाठी १८८ धावांचं आव्हान
दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला
वॉशिंग्टन सुंदरने घेतला बळी
दरम्यान दुसऱ्या बाजूने कर्णधार श्रेयस अय्यरचंही अर्धशतक
युजवेंद्र चहलने घेतला बळी
दिल्लीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पार्थिव पटेलने घेतला झेल
दिल्लीच्या संघाला आजच्या सामन्यात विजय महत्वाचा