IPL 2019 Final MI vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.
हे वाचा : IPL 2019 Final : लढवय्या! रक्तबंबाळ पायाने वॉटसन अखेरपर्यंत लढला…
या सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज दिली. एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो शेवटच्या षटकात ८० धावांवर धावचीत झाला. त्याने ५९ चेंडूत ८० धावा केल्या. पण महत्वाचे म्हणजे ही खेळी त्याने पायाला दुखापत झालेली असताना आणि त्या जखमेतून रक्त वाहत असताना केली.
World Cup 2019 : ”चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी ‘टीम इंडिया’कडे हवे तेवढे पर्याय”
चेन्नई संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने याबाबत माहिती दिली. ”त्याच्या (वॉटसन) गुडघ्याजवळ असलेलं रक्त तुम्ही पाहू शकता का? सामन्यानंतर वॉटसनला तब्बल ६ टाके पडले. मैदानावर डाइव्ह मारताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण कोणालाही काहीही न सांगता वॉटसन एकटा खेळत राहिला”, असे हरभजनने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले आहे. या बरोबरच त्याने वॉटसनच्या खेळीचीही स्तुती केली.
त्यानंतर चेन्नईच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले. ‘चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सगळ्या चाहत्यांचा उत्साह पाहून एक गोष्ट समजली की वॉटसनने गुडघ्याच्या संरक्षणासाठी वापरलेली knee कॅप हाच आमच्यासाठी IPL विजेतेपदाचा कप आहे’ असे CSK कडून ट्विट करण्यात आले आहे.
The emotions that all the #yellove hearts are going through makes us #believe in one thing! Watto’s knee cap is our cup! #WhistlePodu4Ever @ShaneRWatson33 #WhistlePodu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 14, 2019
दरम्यान, १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. धोनीने ८ चेंडूत २ धावा केल्या.
Cricket Awards : विराट, रोहित सर्वोत्तम; मराठमोळ्या स्मृती मंधानालाही पुरस्कार
एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो ८० धावांवर धावचीत झाला. नंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.
त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. ४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.
IPL 2019 : मास्टरब्लास्टरच्या कौतुकानंतर बुमराह म्हणतो ‘सचिन सर…’
प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.