आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच्या बाद फेरीत प्रवेश करण्याच्या आशांवर पाणी फिरलं आहे. अखेरचा साखळी सामना खेळणाऱ्या राजस्थानला दिल्लीच्या संघाने ५ गडी राखून हरवलं. राजस्थानच्या गोलंदाजांची या हंगामातली कामगिरीही फारशी चांगली झाली नाही. सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या जयदेव उनाडकटला यंदा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
Worst economy rate for a team in Twenty20s: (Min: 400 balls)
10.27 – JAYDEV UNADKAT for RR
9.88 – Daniel Christian for NottsWorst economy rate for a team in the IPL: (Min: 400 balls)
10.27 – JAYDEV UNADKAT for RR
9.24 – Shardul Thakur for CSK#IPL2019 #KKRvRR— Sampath Bandarupalli (@SampathStats) April 25, 2019
त्याच्या याच कामगिरीवरुन ट्विटरवर एका व्यक्तीने उनाडकटला ट्रोल करत, कोणत्यातरी अकादमीत जाऊन गोलंदाजी कशी करतात हे शिकून घे असा सल्ला दिला. या ट्रोलिंगला उनाडकटनेही तितक्याच समर्पक भाषेत उत्तर दिलं आहे.
Please enroll into an cricket academy and learn how to bowl
— Rachit Mathur (@rachitmathur5) May 5, 2019
गेले दोन हंगाम राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात उनाडकटला राजस्थानच्या संघात जागा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.