मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रंगणाऱ्या सामन्याआधी हैदराबादच्या संघाला धक्का बसला आहे. दुखापतीमधून सावरत संघामध्ये पुनरागमन केलेला कर्णधार केन विल्यमसन मायदेशी परतला आहे. त्यामुळे चेपॉकच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात केन विल्यमसनऐवजी भुवनेश्वर कुमार संघाचं नेतृत्व करणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2019 : ठरलं, मुंबई इंडियन्समध्ये ‘हा’ खेळाडू घेणार अल्झारी जोसेफची जागा
मिळालेल्या माहितीनुसार, केन विल्यमसनच्या आजीचं निधन झाल्यामुळे तो मायदेशी रवाना झाला आहे. मात्र २७ तारखेला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो संघात परतणार आहे. याआधीही विल्यमसनच्या अनुपस्थितीत बाराव्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भुवनेश्वरने हैदराबादच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचसोबत हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.