IPL 2019 KKR vs MI : कोलकाताच्या मैदानावरील मुंबईविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसल (८०*), शुभमन गिल (७६) आणि ख्रिस लिन (५४) यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याने २ बाद २३२ धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला २३३ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात रसलने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या तोडीस तोड तोड खेळी मुंबईच्या हार्दिक पांड्याने केली. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला.
२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. सुरुवातीपासूनच फटकेबाजी आवश्यक असल्याचे समजून घेत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो भोपळाही न फोडता माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली. पण त्यात पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांना मान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचा रिव्ह्यू वाचला, पण रोहितला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला. डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण रसलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवने पुढाकार घेतला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. पण याचदरम्यान रसलच्या कंटूर गोलंदाजीमुळे तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २६ धावा केल्या.
हार्दिक पांड्याला संयमी साथ देणारा कायरन पोलार्ड २० धावांवर झेलबाद झाला. पण हार्दिकने १७ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली. हार्दिकचे हे अर्धशतक यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. हार्दिक पांड्याने ऋषभ पंत याचा विक्रम मोडला. पंतने मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम हार्दिकने मोडीत काढला.
.@hardikpandya7 tonight
Fastest fifty in #IPL2019
Joint-fastest fifty for an #MI player #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #KKRvMI pic.twitter.com/sgMT13r4dX— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2019
दरम्यान त्याआधी रसलने तब्बल ८ षटकार लगावले. या षटकारांच्या आतषबाजीमुळेच रसलने यंदाच्या हंगामात षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. गिल, लिन आणि रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.
IPL 2019 : हार्दिकच्या फटकेबाजीवर रसलची सरशी; कोलकाताचा मुंबईवर विजय
त्यानंतर मैदानावर आलेल्या आंद्रे रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.