एकेकाळी आयपीएलमधील बंगळुरु संघाचा प्रमुख खेळाडू लोकेश राहुल सध्या, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य आहे. अकराव्या हंगामात पंजाबने राहुलला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. बंगळुरुत असताना ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या साथीने फलंदाजी करणारा लोकेश राहुल बंगळुरुचा कणा मानला जात होता. मात्र राहुलच्या मते बंगळुरु संघातून बाहेर पडल्यावर त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. तो India Today वाहिनीशी बोलत होता.

“बंगळुरुत असताना मी ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या छायेखाली वावरत होतो. मात्र पंजाबमध्ये गेल्या हंगामापासून मी सलामीला फलंदाजीला येतोय. या संघात माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे. कदाचीत याच कारणामुळे माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे बंगळुरुमधून बाहेर पडलो हे माझ्यासाठी चांगलंच झालंय. २०१८ साल हे माझ्या आयपीएल करिअरमधलं चांगलं वर्ष होतं.” लोकेशने आपलं म्हणणं मांडलं.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन भिडू, अल्झारी जोसेफला संघात स्थान

अकराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने, पर्वाची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली होती. लोकेश राहुलने अकराव्या हंगामात खोऱ्याने धावा काढल्या होत्या. बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सुरुवात संमिश्र झाली आहे. पंजाबला दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये राहुलला आपली छाप पाडता आलेली नाहीये. त्यामुळे आगामी काळात त्याचा खेळ कसा होतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader