किंग्ज इलेव्हन पंबाज संघाचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने, आयपीएलमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना, मुंबई इंडियन्सविरुद्ध ख्रिस गेलने आयपीएलमधल्या 300 व्या षटकाराची नोंद केली.

महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाच्या नावावर 200 षटकारही नोंदवले गेलेले नाहीयेत. एबी डिव्हीलियर्सच्या नावावर सध्या 193 षटकार जमा आहेत. त्यामुळे या शर्यतीत ख्रिस गेल इतरांच्या भरपूर पुढे निघून गेला आहे.

दरम्यान, पंजाबच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी आश्वासक सुरुवात केल्यानंतरही मुंबईचा संघ 176 धावांपर्यंतच मजल मारु शकला. क्विंटन डी-कॉकने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Video : जेव्हा ‘पिझ्झाबॉय’ संजू सॅमसनचा झंजावात थांबवतो

Story img Loader