किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विनने राजस्थानच्या जोस बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद केलं. यानंतर आश्विनची कृती योग्य की अयोग्य याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं. शनिवारी पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यातही पंजाबचा एक फलंदाज अशाच ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद होता होता राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचा फिरकीपटू कृणाल पांड्या 10 व्या षटकात गोलंदाजी करत असताना मयांक अग्रवाल धाव घेण्याच्या तयारीत होता. यावेळी कृणाल पांड्याने मध्येच थांबत अग्रवालला बाद करण्याची हुल दिली. या प्रकारानंतर मैदानात उपस्थित खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोडसं हसु उमटलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान, ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना, मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेलं 177 धावांचं आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. पंजाबकडूल सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतक झळकावलं, त्याला मयांक आणि ख्रिस गेलने फटकेबाजी करत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – IPL 2019 : ‘Universal Boss’ गेल समोर सगळे फेल, केली अनोख्या विक्रमाची नोंद

पंजाबच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के देण्यात मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गेल आणि राहुल जोडीने 53 धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर ख्रिस गेलला माघारी धाडण्यात कृणाल पांड्याला यश आलं. मात्र त्यानंतरही लोकेश राहुलने आधी मयांक अग्रवाल आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलने नाबाद 71 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 बळी घेतले. याव्यतिरीक्त एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

अवश्य वाचा – Video : जेव्हा ‘पिझ्झाबॉय’ संजू सॅमसनचा झंजावात थांबवतो