ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना, मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेलं 177 धावांचं आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. पंजाबकडूल सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतक झळकावलं, त्याला मयांक आणि ख्रिस गेलने फटकेबाजी करत चांगली साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के देण्यात मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गेल आणि राहुल जोडीने 53 धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर ख्रिस गेलला माघारी धाडण्यात कृणाल पांड्याला यश आलं. मात्र त्यानंतरही लोकेश राहुलने आधी मयांक अग्रवाल आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलने नाबाद 71 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 बळी घेतले. याव्यतिरीक्त एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

त्याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. सलामीवीर क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी आश्वासक सुरुवात केल्यानंतरही मुंबईचा संघ 176 धावांपर्यंतच मजल मारु शकला. क्विंटन डी-कॉकने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली.

रोहित आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. मात्र रोहित शर्मा आणि डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यानंतर उर्वरित फलंदाजांना पंजाबच्या गोलंदाजांनी झटपट माघारी धाडलं. सूर्यकुमार यादव, युवराज सिंह, कायरन पोलार्ड मोठे फटके खेळण्याच्या नादात माघारी परतले. अखेरच्या षटकांमध्ये पांड्या बंधूनी फटकेबाजी करत मुंबईला 176 धावांपर्यंत मजल मारुन दिली. पंजाबकडून मुरगन आश्विन, मोहम्मद शमी आणि विल्जोएन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्यांना अँड्रू टायने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

Live Blog

Highlights

  • 17:11 (IST)

    मुंबईला चौथा धक्का, युवराज सिंह माघारी

    ????? ?????????? ?????????? ???? ???? ??????????? ????????? ?????? ??????

  • 17:03 (IST)

    मोहम्मद शमीचा मुंबईला धक्का, डी-कॉक माघारी

    ???????? ???? ???? ??-??? ???? ????? ?????

  • 16:57 (IST)

    क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक, मुंबईचा डाव सावरला

    ?????? ???? ??? ??????? ??-????? ???????? ????????

  • 16:26 (IST)

    मुंबईच्या सलामीवीरांची आश्वासाक सुरुवात

    ??????? ????? ????? ??? ??????? ??-??? ????? ?????? ???????? ????????? ????? ????

19:45 (IST)30 Mar 2019
लोकेश राहुल, डेव्हिड मिलरकडून पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब

71 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत राहुलचा पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा

19:06 (IST)30 Mar 2019
पंजाबला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल बाद

कृणाल पांड्याने स्वतःच्या गोलंदाजीवरच घेतला अग्रवालचा झेल

18:39 (IST)30 Mar 2019
अखेर ख्रिस गेलला जाळण्यात अडकवण्यात मुंबईला यश

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना गेल हार्दिककडे झेल देऊन माघारी

18:38 (IST)30 Mar 2019
पंजाबची आक्रमक सुरुवात

ख्रिस गेलच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर झटपट 50 धावांचा टप्पा गाठला

17:45 (IST)30 Mar 2019
मुंबईची मजल 176 धावांपर्यंत

पंजाबला विजयासाठी 177 धावांचं आव्हान

17:39 (IST)30 Mar 2019
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या माघारी

मुंबईला सातवा धक्का, मोहम्मद शमीने घेतला बळी

17:33 (IST)30 Mar 2019
कृणाल पांड्या माघारी, मुंबईला सहावा धक्का

विल्जोएनने घेतला बळी

17:25 (IST)30 Mar 2019
कायरन पोलार्ड माघारी,मुंबईचा निम्मा संघ माघारी

मोक्याच्या क्षणी पंजाबचं सामन्यात पुनरागमन

17:11 (IST)30 Mar 2019
मुंबईला चौथा धक्का, युवराज सिंह माघारी

मुरगन आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात युवराज झेलबाद

17:03 (IST)30 Mar 2019

अर्धशतकी खेळी करुन डी-कॉक ठरला शमीचा शिकार

16:57 (IST)30 Mar 2019

युवराज सिंह आणि क्विंटन डी-कॉकची महत्वाची भागीदारी

16:30 (IST)30 Mar 2019
ठराविक अंतराने सूर्यकुमार यादवही माघारी, मुंबईला दुसरा धक्का

मुरगन आश्विनने घेतला बळी

16:27 (IST)30 Mar 2019
मुंबईला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी

अँड्रू टायच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होऊन माघारी. मात्र प्रत्यक्षात चेंडू लेग स्टम्पला लागत नसल्याचं उघड झालं.

रोहित शर्माची दुर्दैवी विकेट

16:26 (IST)30 Mar 2019
मुंबईच्या सलामीवीरांची आश्वासाक सुरुवात

कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी संघाला अर्धशतकी धावसंख्या गाठून दिली

15:38 (IST)30 Mar 2019
रविचंद्रन आश्विनने नाणेफेक जिंकली

घरच्या मैदानावर खेळताना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय