मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात, अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मुंबईने 170 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संकटात सापडलेल्या आपल्या संघाला आश्वासक धावसंख्येपर्यंत आणलं. चेन्नईकडून अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने एक बहुमान आपल्या नावावर केला आहे. ब्राव्हो चेन्नईकडून गोलंदाजीमध्ये 100 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्राव्होने मुंबईचा अर्धशतकवीर गोलंदाज सूर्यकुमार यादवला बाद केलं. उंच फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार 59 धावांवर बाद झाला. त्याने 59 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी 1-1 बळी घेतला. मात्र अखेरच्या षटकात हार्दिक आणि कायरन पोलार्डने ब्राव्होची चांगलीच धुलाई केली.