आयपीएलमध्ये चौथं विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही संघ आज हैदराबादच्या मैदानावर समोरासमोर येणार आहेत. चेन्नईच्या संघाने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाच्या नावावर आयपीएलची ३ विजेतेपदं जमा आहेत. मुंबईने पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईवर मात करुन आपलं अंतिम फेरीतलं स्थान निश्चीत केलं आहे.
आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामना जिंकण्यासाठी नाणेफेक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत ११ अंतिम सामन्यांपैकी ८ वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. केवळ २००९, २०१२ आणि २०१५ साली नाणेफेक जिंकलेला संघ विजयी ठरु शकला नाही.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामांमध्ये अंतिम सामन्यात नाणेफेकीचं महत्व कसं राहिलेलं आहे यावर एक नजर टाकूयात…
हंगाम सामना नाणेफेक विजेते
२००८ राजस्थान विरुद्ध चेन्नई राजस्थान राजस्थान
२००९ डेक्कन विरुद्ध बंगळुरु बंगळुरु डेक्कन चार्जर्स
२०१० चेन्नई विरुद्ध मुंबई चेन्नई चेन्नई
२०११ चेन्नई विरुद्ध बंगळुरु चेन्नई चेन्नई
२०१२ कोलकाता विरुद्ध चेन्नई चेन्नई कोलकाता
२०१३ चेन्नई विरुद्ध मुंबई मुंबई मुंबई</p>
२०१४ कोलकाता विरुद्ध पंजाब कोलकाता कोलकाता
२०१५ चेन्नई विरुद्ध मुंबई चेन्नई मुंबई
२०१६ हैदराबाद विरुद्द बंगळुरु हैदराबाद हैदराबाद
२०१७ मुंबई विरुद्ध पुणे मुंबई मुंबई
२०१८ चेन्नई विरुद्ध हैदराबाद चेन्नई चेन्नई
त्यामुळे यंदाच्या हंगामातही नाणेफेक जिंकलेला संघ बाजी मारतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.