आयपीएलचा बारावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 23 मार्च रोजी गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. Star Sports या वाहिनीने प्रत्येक संघातील महत्वाच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक जाहीरातीचं कँपेन केलं. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू ऋषभ पंतने धोनीला, “तू माझ्या गुरुसारखा असलास तरीही मैदानात यंदा मी तुझ्या संघावर इतका बरसेन की पाहत बसशील”, असं आव्हान दिलं.

पंतच्या या आव्हानाला प्रत्युत्तरही धोनीने तितक्याच दमदार पद्धतीने दिलं आहे. धोनीने पंतला मैदानात ये, खेळ दाखव आणि नाव कमव असं आव्हान दिलं आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेल्या द्वंद्वाचा व्हिडीओ Star Sports ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या लढतीत प्रत्यक्ष मैदानात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader