यष्टींमागे चपळ हालचालींसाठी ओळखला जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी पहिल्या स्थानावर पोहचला आहे. बाराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात धोनीने कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकला माघारी धाडत हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
दिनेश कार्तिक या यादीमध्ये १३१ बळींसह पहिल्या स्थानावर होता. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात धोनीने यष्टींमागे २ बळी घेत कार्तिकच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धोनीने यष्टींमागे मुंबईच्या क्विंटन डी-कॉकचा झेल पकडत आपलं पहिलं स्थान पक्क केलं.
आयपीएलमध्ये यष्टींमागे सर्वाधिक बळी घेणारे यष्टीरक्षक –
- महेंद्रसिंह धोनी – १३३
- दिनेश कार्तिक – १३१
- रॉबिन उथप्पा – ९०
- पार्थिव पटेल – ८२
- नमन ओझा – ७५
आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात धोनीने ही कामगिरी केली असल्यामुळे पुढच्या हंगामापर्यंत धोनी आपलं पहिलं स्थान कायम राखणार आहे.