भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. शनिवारपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या बाराव्या पर्वात, विराट कोहलीचा बंगळुरु संघ धोनीच्या चेन्नईविरुद्ध लढणार आहे. बंगळुरुचा संघ गेल्या काही पर्वांमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाहीये. मात्र विराट कोहली आपली भूमिका चोखपणे बजावतो आहे. चेन्नईविरुद्ध 21 डावांमध्ये विराट कोहलीने 732 धावा केल्या आहेत.
अवश्य वाचा – Video : सरावातून वेळ काढत धोनीने पूर्ण केली लहानग्यांची इच्छा
विराटच्या कोहलीच्या चेन्नईविरुद्ध खेळीमध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र कोहलीच्या या झंजावाताला रोखण्यासाठी महेंद्रसिंह धोनी आपलं ठेवणीतलं हत्यार वापरण्याची शक्यता आहे. चेन्नईविरुद्ध खेळत असताना विराट कोहली रविंद्र जाडेजाच्या फिरकीला बळी पडला आहे.
अवश्य वाचा – IPL 2019 : पहिल्या सामन्यासाठी विराट-धोनी सज्ज, मैदानावर कसून सराव
2009 सालापासून विराट कोहलीने रविंद्र जाडेजाविरुद्ध खेळत असताना 104 चेंडूत केवळ 96 धावा केल्या आहेत. 2009 पासून 18 सामन्यांमध्ये जाडेजाने कोहलीच्या फलंदाजीला चाप लावून त्याला 3 वेळा बाद केलं आहे. मागच्या हंगामातही जाडेजाने कोहलीला आपल्या फिरकीवर माघारी धाडलं होतं. त्यामुळे शनिवारी रंगणाऱ्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीवर अंकुश लावण्यासाठी धोनी जाडेजाचा वापर करु शकतो.