बंगळुरूच्या मैदानावर खेळण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मुसळधार पावसामुळे सामना ५-५ षटकांचा खेळवण्यात येणार होता. त्यानुसार बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला ६३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १० चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. सामना अनिर्णित राहिल्यामुळे बंगळुरूच्या ‘प्ले-ऑफ्स’ फेरीत पोहोचण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या. तसेच राजस्थानचादेखील ‘प्ले-ऑफ्स’ फेरीत पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला. या सामन्यानंतर ची गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
दिल्ली कॅपिटल्स१२+०.२३३१६
चेन्नई सुपरकिंग्ज१२-०.११३१६
मुंबई इंडियन्स१२+०.३४७१४
सनराईजर्स हैदराबाद१२+०.७०९१२
राजस्थान रॉयल्स१३-०.३२१११
कोलकाता नाईट रायडर्स१२+०.१००१०
किंग्ज इलेव्हन पंजाब१२-०.२९६१०
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१३-०.६९४

सामना अनिर्णित राहिल्याचा सर्वात मोठा फटका बंगळुरूला बसला. या सामन्याआधी राजस्थानचा संघ १२ सामन्यांपैकी ५ विजय मिळवून १० गुणांसह सातव्या क्रमांकावर होता, तर बंगळुरूचा संघ १२ पैकी ४ विजय मिळवून ८ गुणांवर होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोनही संघाना १-१ गुण देण्यात आला. आजच्या सामन्यात देण्यात आलेल्या गुणांमुळे बंगळुरूचा संघ ९ गुणांवर पोहोचला. आता उर्वरित १ सामना जिंकूनही बंगळुरूला जास्तीत जास्त ११ गुण कमावता येतील. पण सध्याच्या गुणतालिकेनुसार मुंबई आणि हैदराबाद यांच्या खात्यात ११ पेक्षा जास्त म्हणजेच अनुक्रमे १४ आणि १२ गुण आहेत. त्यामुळे बंगळुरूच्या IPL 2019 स्पर्धेला पूर्णविराम लागला. दुसरीकडे राजस्थानच्या संघाला १ गुण मिळाला असून त्यांचे एकूण गुण ११ झाले आणि राजस्थान पाचव्या स्थानी पोहोचले. उर्वरित एका सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे १३ गुण होतील. पण हैदराबादचे सध्या १२ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेटदेखील +०.७०९ म्हणजेच आठही संघांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे हैदराबादने दोनही सामने गमावले तरच राजस्थानला ‘प्ले-ऑफ्स’मध्ये पोहोचण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 points table rcb playoff hopes over rr will have tough way ahead