IPL 2019 : युवा रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने, कोलकाता नाईट रायडर्सवर ३ गडी राखून मात केली आहे. एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग ४७ धावांवर हिट विकेट झाला. त्याने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकार लगावले. केवळ ३ धावांमुळे त्याचा एक विक्रम हुकला. IPL च्या इतिहासात सर्वात तरुण अर्धशतकवीर होण्याची संधी त्याच्याकडून हुकली. पण या हंगामात त्याने एक विक्रम केला. या हंगामात हिट विकेट होणारा रियान पहिलाच फलंदाज ठरला.

दरम्यान, एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं आव्हान रियानच्या फलंदाजीमुळे पूर्ण केलं. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या काही षटकांत जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. नरीनने रहाणेला माघारी धाडल्यानंतर राजस्थानच्या डावाला खिंडार पडलं. संजू सॅमसन, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी ठराविक अंतराने माघारी परतले. अखेरीस रियान परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करत राजस्थानला विजयपथावर आणून ठेवलं. कोलकात्याकडून पियुष चावलाने ३, सुनील नरीनने २ तर प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

रियान पराग

त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं.

ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद ९७ धावा केल्या.

मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरच्या षटकांत दिनेशने कोलकात्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राजस्थानकडून वरुण अरॉन अष्टपैलू चमक दाखवली. त्याने दोन बळींसोबत एक झेल आणि धावबादही केला. याव्यतिरीक्त ऑशने थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rajasthan batsman riyan parag becomes 1st player to get hit wicket in this season