आयपीएलच्या बाराव्या हंगामाचं पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं. 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघाच्या आजी-माजी कर्णधारांमधला हा सामना असल्यामुळे प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या या सामन्याकडे नजरा लागलेल्या आहेत. इतकच काय दोन्ही संघही आता ट्विटरवर एकमेकांशी सामना करायला सज्ज झाले आहेत.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या ट्विटर हँडलवरुन चेन्नईच्या संघाला आव्हान देणारं एक गमतीशीर ट्विट टाकलं.
A spicy south Indian Derby for starters – but we prefer the sweet sambar…
Our VIVO IPL 2019 begins away from Bengaluru on Day 1 #PlayBold
— Royal Challengers (@RCBTweets) February 19, 2019
मात्र चेन्नईनेही हम किसीसे कम नही म्हणत बंगळुरुच्या ट्विटला तितकचं चोख प्रत्युत्तर दिलं.
But sambar is always #Yellove in colour no? https://t.co/f5Rw9ZtpH6
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 19, 2019
आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे.