आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपला पहिला विजय मिळवण्यासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला अजुन वाट पहावी लागणार आहे. गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या स्वैर माऱ्याच्या जोरावर, कोलकात्याविरुद्ध सामन्यात बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. आंद्रे रसेलने फटकेबाजी करत एका क्षणाला अशक्यप्राय वाटणारं 206 धावांचं आव्हान संघाला सहज पूर्ण करुन दिलं. 5 गडी राखून सामना जिंकत कोलकात्याने बंगळुरुच्या प्रयत्नावर पुन्हा एकदा पाणी फिरवलं. आंद्रे रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 48 धावा केल्या.
सलग चार पराभव पदरी पडल्यानंतर बंगळुरुच्या संघाने कोलकात्याविरुद्ध सामन्यात आपल्या कामगिरीमध्ये चांगली सुधारणा केली. नवदीप सैनीने सुनिल नरिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. यानंतर ख्रिल लिन, रॉबिन उथप्पा जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. या दोन्ही कोलकात्याच्या डावाला आकार दिला. मात्र रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर कोलकात्याचा एक-एक फलंदाज हजेरी लावून माघारी परतले. मात्र अखेरच्या षटकात आंद्रे रसेल आणि शुभमन गिल जोडीने फटकेबाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून पवन नेगी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2-2 तर युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला.
त्याआधी, कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला बाराव्या हंगामात अखेरीस सूर सापडला. घरच्या मैदानावर खेळत असताना, बंगळुरुने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर 205 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने 84 धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्सनेही चांगली साथ दिली.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय चुकला. पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेत, पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. अखेरीस नितीश राणाने पार्थिवला माघारी धाडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर विराटने डिव्हीलियर्सच्या साथीने फटकेबाजी सुरुच ठेवली.
काही वेळाने डिव्हीलियर्सनेही आपल्या जुन्या रंगात येत कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराटपाठोपाठ डिव्हीलियर्सनेही आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हीलियर्सही सुनिल नरीनचा शिकार बनला. त्याने 32 चेंडूत 63 धावा केल्या. कोलकात्याकडून सुनिल नरीन, नितीश राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
मोठा फटका खेळण्याच्या नादात कार्तिक झेलबाद
युजवेंद्र चहलने घेतला बळी
पवन नेगीने उडवला लिनचा त्रिफळा
पवन नेगीच्या गोलंदाजीवर टीम साऊदीने पकडला उथप्पाचा झेल
दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
नवदीप सैनीने घेतला बळी
कोलकात्याला विजयासाठी 206 धावांचं आव्हान
सुनिल नरीनने घेतला बळी
कुलदीप यादवने स्वतःच्या गोलंदाजीवरच घेतला विराटचा झेल
दोन्ही फलंदाजांकडून कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार
कोहलीने डिव्हीलियर्सच्या साथीने आपली झुंज कायम ठेवली आहे.
नितीश राणाच्या गोलंदाजीवर पार्थिव त्रिफळाचीत, बंगळुरुला पहिला धक्का
पार्थिव पटेल आणि विराट कोहली जोडीची अर्धशतकी भागीदारी
बंगळुरुच्या संघात दोन बदल, कोलकात्याच्या संघात केवळ एक बदल