आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने, आयपीएलच्या बाराव्या हंगामात आज एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने ही अनोखी कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या सुरेश रैनाने सर्वात पहिल्यांदा 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

विराट कोहलीलाही पहिल्या सामन्यात 5 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी होती. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या 52 धावा तो करु शकला नाही. पहिल्या सामन्यात अवघ्या 6 धावांवर त्याला माघारी परतावं लागलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात या यादीत आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी विराटला 46 धावांची गरज होती. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराटने ही कामगिरी केली. मात्र त्याच षटकात जसप्रीत बुमराहने कोहलीला माघारी धाडलं.

अवश्य वाचा – Video : Yuvi is Back ! चहलच्या गोलंदाजीवर षटकारांची हॅटट्रिक

Story img Loader