IPL 2019 RCB vs RR Updates : बंगळुरूच्या मैदानावर खेळण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मुसळधार पावसामुळे सामना ५-५ षटकांचा खेळवण्यात येणार होता. त्यानुसार बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला ६३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १० चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. या पराभवाबरोबरच बंगळुरूचे आव्हान संपुष्टात आले.

सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना सुरु होण्यास खूप उशीर झाला. पण सामना सुरु होताच विराटने पहिल्या २ चेंडूंवर षटकार मारून धमाकेदार सुरुवात केली. कोहलीपाठोपाठ डीव्हिलियर्सने देखील दणकेबाज सुरुवात केली. त्यामुळे पहिल्याच षटकात बंगळुरूने २३ धावांपर्यंत मजल मारली. पण पुढच्याच षटकात श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेत राजस्थानला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने विराट कोहली (२५), एबी डिव्हिलियर्स (१०) आणि मार्कस स्टॉयनीस (०) यांचे बळी घेतले.

त्यानंतर मात्र कोणीही फलंदाज जबाबदारीने खेळ करू शकला नाही. गुरकीरत सिंग (६), पार्थिव पटेल (८), एन्रिक क्लासे (६) आणि पवन नेगी (४) झटपट बाद झाले. त्यामुळे बंगळुरूच्या संघ ५ षटकात ७ बाद ६२ धावा करू शकला. श्रेयस गोपाळने ३, ओशेन थॉमसने २ तर उनाडकट आणि रियान पराग यांनी १-१ गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात केली. त्यांनी २० चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर संजू सॅमसन झेलबाद झाला. त्याने २८ धावा केल्या. यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली, त्यामुळे अखेर खेळ रद्द करण्यात आला आणि सामना अनिर्णितच राहिला.

Live Blog

00:54 (IST)01 May 2019
पावसाने काढली बंगळुरूची ‘विकेट’; सामना अनिर्णित

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. राजस्थानला १० चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. या पराभवाबरोबरच बंगळुरूचे आव्हान संपुष्टात आले.

00:26 (IST)01 May 2019
संजू सॅमसन झेलबाद; राजस्थानला पहिला धक्का

संजू सॅमसन झेलबाद झाला. त्याने २८ धावा केल्या. यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली

00:16 (IST)01 May 2019
राजस्थानच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात

आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात केली. त्यांनी २० चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली.

23:59 (IST)30 Apr 2019
गोपाळची हॅटट्रिक; राजस्थानला ६३ धावांचे आव्हान

गोपाळची हॅटट्रिक; राजस्थानला ६३ धावांचे आव्हान

23:56 (IST)30 Apr 2019
पवन नेगी बाद; बंगळुरूला सातवा धक्का

केल्या ६ चेंडूत ४ धावा

23:54 (IST)30 Apr 2019
एन्रिक क्लासे झेलबाद; बंगळुरूला सहावा धक्का

७ चेंडूत केल्या ६ धावा

23:52 (IST)30 Apr 2019
पार्थिव पटेल बाद; बंगळुरूला पाचवा धक्का

८ धावांमध्ये एका चौकाराचा समावेश

23:46 (IST)30 Apr 2019
गुरकीरत सिंग बाद; बंगळुरूचा चौथा धक्का

१ चौकार लगावत केल्या ६ धावा

23:36 (IST)30 Apr 2019
श्रेयस गोपाळची हॅट्ट्रिक; बंगळुरूचे ३ गडी माघारी

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनीस यांचे घेतले बळी

23:33 (IST)30 Apr 2019
विराट - डीव्हिलियर्सची दणकेबाज सुरुवात

कोहली पाठोपाठ डीव्हिलियर्सनेदेखील दणकेबाज सुरुवात केली. त्यामुळे पहिल्याच षटकात बंगळुरूने २३ धावांपर्यंत मजल मारली.

23:27 (IST)30 Apr 2019
सामना सुरू; विराटची धमाकेदार सुरूवात

सामना सुरु होताच विराटने पहिल्या २ चेंडूंवर षटकार मारून धमाकेदार सुरुवात केली.

23:13 (IST)30 Apr 2019
५ षटकांचा होणार सामना

११ वाजून २६ मिनिटांनी सामना सुरू होणार असून सामना ५-५ षटकांचा होणार आहे.

- ५ षटकांचा होणार सामना

- २ षटकांचा असेल पॉवर-प्ले

- एका गोलंदाजाला कमाल १ षटक

23:06 (IST)30 Apr 2019
पुन्हा होणार खेळपट्टीचा पाहणी

११.०५ तो पाहणी करण्यात येणार आहे

22:51 (IST)30 Apr 2019
अजूनही सामना सुरु झालेला नाही

१०. ४० ला मैदानाची पाहणी करण्यात येणार होती, मात्र अद्याप सामना सुरु झालेला नाही. IPL कडून सामन्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

21:25 (IST)30 Apr 2019
अद्यापही पावसाचा जोर कायम

अद्यापही बंगळुरूच्या मैदानावर पावसाचा जोर कायम आहे.  थोड्या काळासाठी पावसाने उसंत घेतली होती, पण नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.

अद्यापही पावसाचा जोर कायम
Caption
20:04 (IST)30 Apr 2019
पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब

बंगळुरूमध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब होत आहे. हा सामना दोनही संघांसाठी महत्वाचा आहे.

-

19:36 (IST)30 Apr 2019
नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम गोलंदाजी

सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या नशिबाने आजही त्याला नाणेफेकीत साथ दिली नाही. यंदाच्या IPL मध्ये १३ पैकी १० सामन्यात विराटला नाणेफेक जिंकता आलेली नाही.