आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. रविवारी ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईड रायडर्स संघाविरुद्धचा सामना रोहितचा कर्णधार म्हणून शंभरावा सामना ठरला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर रोहित शर्माची कामगिरी ही नेहमीच चांगली राहिलेली आहे. आजच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि ईडन गार्डन्स मैदानाचं नात अधिकच दृढ झालं आहे.

२००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात याच मैदानावर रोहितने पदार्पण केलं होतं. यानंतर आयपीएलमधलं पहिलं शतक, कर्णधार म्हणून पदार्पण, पहिलं आयपीएल विजेतेपद अशा अनेक महत्वाच्या घटना रोहितने ईडन गार्डन्स मैदानाच्या साथीने अनुभवल्या आहेत. त्यामुळे कोलकात्याविरुद्ध सामन्यात रोहित कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader