आयपीएलच्या बाराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 199 धावांचं आव्हान हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. त्याआधी राजस्थानकडून संजू सॅमसनने शतकी खेळी केली. बाराव्या हंगामातलं हे पहिलं शतक ठरलं आहे. संजूने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत 102 धावा केल्या.

संजू सॅमसनच्या झंजावातावर अंकुश ठेवणं, हैदराबादच्या गोलंदाजांना जमलं नाही. मात्र विजय शंकर बाराव्या षटकाचा अखेरचा चेंडू टाकत असताना अचानक, संजू आपला फलंदाजीचा पवित्रा सोडून बाजूला झाला. कारण संजू फलंदाजी करत असलेल्या स्टँडसमोर एक ‘पिझ्झाबॉय’ फिरत असल्याने संजूचं लक्ष विचलीत झालं. यावेळी रंगात आलेला सामना काहीक्षणासाठी थांबला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादविरुद्ध 198 धावा चोपल्या. रहाणे व सॅमस या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक झळकावले. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. सॅमसनने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचले. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.

Story img Loader