23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झालं. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

Story img Loader