सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ५ गडी राखून मात केली. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. मात्र सुरेश रैनाने मैदानात तळ ठोकून संघाला विजय मिळवून दिला. रैनाने या सामन्यात ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे.
एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात ८०० पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना आयपीएलमधला पहिला फलंदाज ठरला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्यात रैनाने ८०० धावांचा टप्पा ओलांडला. त्याआधी रैनाने मुंबई इंडियन्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक धावा काढलेले फलंदाज –
सुरेश रैना – (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : ८१८ धावा *
सुरेश रैना – (विरुद्ध मुंबई इंडियन्स) : 803 धावा
विराट कोहली – (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स/डेअरडेविल्स) : ८०२ धावा
ख्रिस गेल – (विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : ७९७ धावा
डेव्हिड वॉर्नर – (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : ७६२ धावा
सुरेश रैना – (विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : ७६१ धावा
कोलकाता नाईट रायडर्सवर ५ गडी राखून मिळवलेल्या विजयामुळे चेन्नईचं गुणतालिकेतलं पहिलं स्थान कायम राहिलेलं आहे. रैनाचं आयपीएलमधलं हे ३६ वं अर्धशतक ठरलं आहे. आतापर्यंत बाराव्या हंगामात फक्त मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता.
अवश्य वाचा – रैना बरसे रे ! चेन्नईचा विजयी धडाका सुरुच, कोलकात्यावर मात