भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनं आयपीएल २०१९ ची आपली ‘ड्रीम टीम’ जाहीर केली आहे. सेहवागच्या या संघात एम. एस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. आज रविवारी मुंबई आणि चेन्नई संघामध्ये २०१२ च्या जेतेपदासाठी लढाई होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील आठ संघातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर सेहवागनं आपली ड्रीम टीम केली आहे. सेहवागनं संघाचा कर्णधार कोणालाही केलं नाही. मात्र, सेहवागनं धोनी ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंतला संधी दिली आहे.

विरेंद्र सेहवागच्या ड्रीम टीममध्ये चार विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे सेहवागनं डेव्हिड वॉर्नला सलामीविर म्हणून पसंती न देता मध्यक्रमचा फलंदाज म्हणून निवडले आहे. विरेंद्र सेहवागने आपल्या ड्रीम टीमध्ये सलामीची जबाबदारी शिखर धवन आणि बेयरस्टोच्या खांद्यावर सोपवली आहे. तर मध्यक्रममध्ये लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर आणि पंत यांना निवडलं आहे. रसेल आणि पांड्याला अष्टपैलू म्हणून निवडलं आहे. फिरकी गोलंदाजात सेहवागनं श्रेयस गोपाल आणि राहुल चहरची निवड केली आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे.

सेहवागची ड्रीम टीम –

शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, केएल राहुल, डेव्हिड वार्नर, पंत, आंद्रे रसेल, हार्दिक पांड्या, रबाडा, राहुल चहर, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह आणि इमरान ताहिर(बारावा खेळाडू)

Story img Loader