आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात मोठ्या धडाक्यात पार पडला. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिनवर पहिल्याच प्रयत्नात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने बोली लावत, त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. गेला हंगाम कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. मुंबई इंडियन्सने लिनवर २ कोटी रुपयांची बोली लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. याचवेळी लिनने आता मला बुमराहविरोधात खेळावं लागणार नाही, असं गमतीने म्हणत सर्वांची पसंती मिळवली आहे.

गेल्या हंगामात लिनने कोलकात्याकडून धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी हंगामात मुंबईच्या संघात लिनला कोणत्या जागेवर संधी मिळते आणि तो आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला…