IPL 2020 Auction : IPL च्या पुढील हंगामासाठी गुरूवारी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. तर पण काही खेळाडू UNSOLD राहिले. लिलावाच्या प्रक्रियेनंतरदेखील काही संघांकडे रक्कम शिल्लक राहिली तर काही संघातील खेळाडूंचे स्लॉटही रिक्त राहिले.

IPL 2020 : जाणून घ्या लिलाव झालेल्या सर्व खेळाडूंची यादी एका क्लिकवर

जाणून घ्या संघाकडे शिल्लक राहिलेली रक्कम आणि खेळाडूंसाठी रिक्त स्लॉट्स (जागा) –

चेन्नई सुपर किंग्ज
शिल्लक रक्कम – १५ लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ३ (२ भारतीय, १ परदेशी)

मुंबई इंडियन्स
शिल्लक रक्कम – १ कोटी ९५ लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – १ (१ भारतीय)

दिल्ली कॅपिटल्स
शिल्लक रक्कम – ९ कोटी
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ३ (३ भारतीय)

कोलकाता नाईट रायडर्स
शिल्लक रक्कम – ८ कोटी ५० लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – २ (२ भारतीय)

किंग्ज इलेव्हन पंजाब
शिल्लक रक्कम – १६ कोटी ५० लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ०

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
शिल्लक रक्कम – ६ कोटी ४० लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ४ (४ भारतीय)

राजस्थान रॉयल्स
शिल्लक रक्कम – १४ कोटी ७५ लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ०

सनरायझर्स हैदराबाद
शिल्लक रक्कम – १० कोटी १० लाख
खेळाडूंसाठी रिक्त जागा – ०

IPL 2020 : हे आहेत Top 5 महागडे भारतीय खेळाडू

असा रंगला IPL 2020 चा लिलाव

पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.