आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत काही अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांपर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजच्या खेळाडूंवर चांगली बोली लागली आहे. आयपीएलचे गेले दोन हंगाम अनपेक्षित बोली घेणाऱ्या जयदेव उनाडकटची यंदाच्या हंगामात मात्र घसरगुंडी उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा जयदेव उनाडकटला संघात कायम ठेवलं असून, यंदा त्याच्यावर ३ कोटी रुपयांची बोली लावण्यात आलेली आहे. २०१८ साली जयदेव उनाडकटवर राजस्थानने १२ कोटी ५० लाख तर २०१९ साली ८ कोटी ४० लाखांची बोली लावली होती. या दोन्ही हंगामांमध्ये जयदेव सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र त्याच्यावर लावण्यात आलेल्या बोलीप्रमाणे त्याची कामगिरी चांगली झाली नाही. याच कारणामुळे राजस्थानने त्याला आगामी हंगामासाठी करारमुक्त करत, लिलावात कमी रक्कम देऊन पुन्हा संघात घेतलं आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात जयदेवची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : ….आणि युवराज सिंहचा विक्रम थोडक्यात बचावला