IPL 2020 Auction updates : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावासाठी ३३० हून अधिक खेळाडूंची नावे शर्यतीत होती. लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वरचष्मा राहिला. पॅट कमिन्स हा लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. TOP 5 महागड्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही.
अशी पार पडली लिलाव प्रक्रिया
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. त्यांच्यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसलाही १० कोटींच्या वरची बोली लागली. तर युसूफ पठाण, कॉलिन डी ग्रँडहोम, चेतेश्वर पुजारा यासारख्या काही खेळाडूंना विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही.
दुसरा टप्पा
लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंना संघात घेण्यात कोणीही बोली लावली नाही. पाच यष्टिरक्षक आणि पाच गोलंदाज UNSOLD राहिले. यात जहीर खान, डेल स्टेन, अॅडम झॅम्पा, मुश्फिकूर रहिम यांसारखे खेळाडू होते. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. या टप्प्यात ‘सॅल्युट मॅन’ शेल्डन कॉट्रेल सर्वात महागडा खेळाडू ठरला.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. विराट सिंग, प्रियम गर्ग, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, रवी बिश्नोई अशा काही निवडक चेहऱ्यांवर बोली लावण्यात आली. त्यात यशस्वी जैस्वाल सर्वात महागडा खेळाडू ठरला.
चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. कॉलिन इनग्राम, मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मार्कस स्टोयनीस, कॉलिन मुनरो, अल्झारी जोसेफ, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. मात्र दमदार खेळाडू शिमरॉन हेटमायर याला बंगळुरूने नाकारल्यानंतर त्याला नवं घर मिळालं. आणखीही काही खेळाडूंवर बोली लागली.
पाचवा टप्पा
पाचव्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात मार्कस स्टॉयनीसला सर्वाधिक ४ कोटी ८० लाखांची बोली लागली. त्याच्याशिवाय काही युवा खेळाडूंनाही दुसऱ्या फेरीत मालक आणि संघ मिळाला. तसेच त्याज्या यादीतील केन रिचर्डसन ४ कोटींच्या बोलीसह बंगळुरूकडे तर ख्रिस जॉर्डन ३ कोटींच्या बोलीसह पंजाबच्या संघात दाखल झाला.
या लिलावाचे सर्व अपडेट्स तुम्ही Loksatta.com च्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पाहू शकता…
कोकणचा निखिल नाईक कोलकाताच्या संघात
अँड्य्रू टाय १ कोटीच्या बोलीसह राजस्थानच्या संघात
डेल स्टेन २ कोटींच्या बोलीसह बंगळुरूकडे
पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेला मार्कस स्टॉयनीस दुसऱ्या फेरीत ४ कोटी ८० लाखांच्या बोलीसह दिल्लीच्या संघात दाखल
साई किशोर २० लाखांना चेन्नईच्या ताफ्यात
युवा तुषार देशपांडे २० लाखांच्या बोलीसह दिल्लीच्या संघात दाखल
प्रभसिमरन सिंग २० लाखाच्या मूळ किमतीत लिलावात उतरला. पहिल्या फेरीत UNSOLD राहिल्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याच्यावर बोली लागली. अखेर पंजाबच्या संघाने त्याला ५५ लाखांच्या बोलीसह संघात दाखल करून घेतलं.
दुसऱ्या फेरीत पवन देशपांडेला मिळाला मालक, बंगळुरूने २० लाखांना घेतलं संघात
संजय यादव २० लाखांना हैदराबादच्या संघात
पहिल्या फेरीत UNSOLD राहिल्यानंतर दुसऱ्या फेरीत मोहित शर्माला दिल्लीच्या संघाने ५० लाखांना संघात घेतले.
दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय सिंग दोघांनाही मुंबई इंडियन्सने प्रत्येकी २० लाखांच्या बोलीसह संघात घेतले.
अनुभवी आणि वयस्क खेळाडू असलेला प्रविण तांबे २० लाखांच्या बोलीसह कोलकाताच्या संघात
ओशेन थॉमस ५० लाखांच्या बोलीसह राजस्थानकडे
केन रिचर्डसन ४ कोटींच्या बोलीसह राजस्थानच्या ताफ्यात
इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला खरेदी करण्यात चढाओढ पहायला मिळाली. अखेर ३ कोटींच्या बोलीसह त्याला पंजाबने संघात घेतले.
टॉम बॅन्टनला १ कोटींच्या बोलीसह कोलकाताच्या संघात स्थान मिळाले तर फॅबियन अॅलन ५० लाखांच्या बोलीसह हैदराबादच्या संघात दाखल
मोहसीन खान २० लाखांच्या बोलीसह झाला मुंबईकर
२० लाखांच्या बोलीसह जोशुआ फिलिप बंगळुरूच्या संघात दाखल
परदेशी ख्रिस ग्रीन २० लाखांच्या बोलीसह कोलकाताच्या ताफ्यात
आयुष बदोनी, संदीप बवानाका, प्रवीण दुबे, शम्स मुलानी, शाहबाझ अहमद, निखिल नाईक हे खेळाडू राहिले UNSOLD
मार्क वूड, अल्झारी जोसेफ, मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन, अॅडम मिल्न, अँडिल फेलुक्वायो, बेन कटिंग, ऋषी धवन, एन्रिच नॉर्चे यांना कोणीही वाली मिळाला नाही.
अनेक वेगवान गोलंदाज UNSOLD राहिले असताना जोश हेजलवूडला चेन्नईने २ कोटींच्या बोलीसह संघात घेतले.
अष्टपैलू जिमी निशमला पंजाबच्या संघाने ५० लाखांच्या बोलीवर संघात घेतले.
अष्टपैलू मिचेल मार्शवर २ कोटींची बोली लागली आणि तो हैदराबादच्या ताफ्यात दाखल झाला
मनोज तिवारी, कॉलिन इनग्राम, मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मार्कस स्टोयनीस, कॉलिन मुनरो हे खेळाडू खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही.
सौरभ तिवारी ५० लाखांच्या बोलीसह मुंबईच्या संघात
धडाकेबाज डेव्हिड मिलर ७५ लाखांच्या बोलीसह राजस्थानच्या संघात
एकदिवसीय मालिकेत भारताची डोकेदुखी ठरलेला वेस्ट इंडीजचा शिमरॉन हेटमायर याला दिल्लीने ७ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह संघात घेतले.
युवा खेळाडू रवि बिश्नोई २ कोटींच्या बोलीसह पंजाबच्या संघात दाखल
नवोदित एम सिद्धार्थ याच्यावर २० लाखांची बोली लागून त्याला कोलकाताच्या संघाने विकत घेतले.
इशान पोरेल २० लाखांच्या किमतीवर पंजाबच्या संघात दाखल
कार्तिक त्यागीला राजस्थानने १ कोटी ३० लाखांची बोली लावून संघात घेतले.
डॅनिअल सॅम्स, पवन देशपांडे, शाहरूख खान, केदार देवधर, के एस भरत, प्रभसिमरन सिंग, अंकुश बेन्स, तुषार देशपांडे, कुलवंत खेजरोलिया, विष्णु विनोद, रेली मेरेडीथ, के सी कॅरिअप्पा, मिथुन सुदेसन, नूर अहमद, आर साई किशोर या युवा खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही.
नवोदित गोलंदाज आकाश सिंग २० लाखांच्या बोलीसह राजस्थानच्या संघात दाखल
अनुज रावत ८० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल २ कोटी ४० लाखांच्या बोलीसह राजस्थानच्या संघात दाखल
गेल्या हंगामात महागडा ठरलेला वरूण चक्रवर्ती ४ कोटींच्या बोलीसह कोलकाताच्या संघात
धडाकेबाज फलंदाज दीपक हुडा ५० लाखांच्या बोलीसह पंजाबच्या संघात दाखल
भारताच्या युवा संघाचा कर्णधार प्रियम गर्ग हा १.९० कोटींच्या बोलीसह हैदराबादच्या संघात