२०२० सालात होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. १९ डिसेंबर रोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला जाणार आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. २०२१ साली सर्व संघमालकांच्या सहमतीने लिलाव नव्याने पार पडला जाणार असून यावेळी अनेक खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२० वर्षासाठी होणारा लिलाव हा छोटेखानी असेल असं कळतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल (Treading Window) करण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आगामी हंगामासाठी संघाची उभारणी आणि खेळाडूंच्या निवडीसाठी प्रत्येक संघमालकाला ८५ कोटींचा निधी देण्यात आला होता, त्यामध्ये गेल्यावर्षीच्या हंगामातून शिल्लक राहिलेल्या ३ कोटींच्या निधीची भर घालण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठीच्या लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघाकडे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.