IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. बंगळुरूच्या संघाने आपल्याकडे असलेल्या रकमेचा हुशारीने वापर करून लिलावात महत्त्वाचे खेळाडू संघात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाहूया लिलावानंतर बंगळुरूचा संपूर्ण संघ

फलंदाज – विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान सिंग, देवदत्त पड्डीकल, अॅरोन फिंच (४.४० कोटी)

गोलंदाज – युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, उमेश यादव, केन रिचर्डसन (४ कोटी), डेल स्टेन (२ कोटी), इसुरू उदाना (५० लाख)

अष्टपैलू – मोईन अली, पवन नेगी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस (१० कोटी), पवन देशपांडे (२० लाख)

यष्टिरक्षक – पार्थिव पटेल, शाहबाझ अहमद (२० लाख), जोशुआ फिलिप (२० लाख)

असा रंगला IPL चा लिलाव

पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.