IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी गुरूवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. ही लिलाव प्रक्रिया कोलकाता येथे झाली. या लिलावामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. हैदराबादच्या संघाने चांगल्या पद्धतीने आपल्या जवळील रकमेचा वापर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फलंदाज – केन विलियम्सन, डेव्हीड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंग (१.९० कोटी), प्रियम गर्ग (१.९० कोटी), अब्दुल समद (२० लाख)

गोलंदाज भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, बसील थम्पी

अष्टपैलूमिचेल मार्श (२ कोटी), फॅबीयन अ‍ॅलन (५० लाख), विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, संजय यादव (२० लाख), संदीप बवानका

यष्टिरक्षक – जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धीमान साहा

IPL लिलाव प्रक्रियेत काय घडलं?

पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.