IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी गुरूवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. ही लिलाव प्रक्रिया कोलकाता येथे झाली. या लिलावामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. पण काही खेळाडू मात्र अनपेक्षितपणे UNSOLD राहिले. त्यांना कोणीही वाली मिळाला नाही.
हे मोठे खेळाडू राहिले UNSOLD
कॉलिन डी ग्रँडहोम – न्यूझीलंड
शे होप – वेस्ट इंडिज
टीम साऊदी – न्यूझीलंड
मार्टिन गप्टिल – न्यूझीलंड
मार्क वूड – इंग्लंड
केजरिक विल्यम्स – वेस्ट इंडिज
जेसन होल्डर – वेस्ट इंडिज
कॉलिन मुनरो – न्यूझीलंड
मुस्तफिजूर रहमान – बांगलादेश
मुश्फिकूर रहिम – बांगलादेश
अशी पार पडली लिलाव प्रक्रिया
पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.