आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबररोजी कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. या आधी सर्व संघमालकांनी आपल्या संघाकडून काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी युवराजसिंहला करारमुक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला युवराज सिंह सध्या टी-२० लिग क्रिकेट खेळतो आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबई इंडियन्सकडून युवराज सिंहला बाहेरचा रस्ता

मुंबई इंडियन्सने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आगामी हंगामात युवराज कोणत्या संघात जाणार याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. २०१९ सालात झालेल्या स्पर्धेसाठी मुंबईने अखेरच्या टप्प्यात युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सहमालक वेंकी मैसुर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सूचक ट्विट करत युवराजला एक आशेचा किरण दाखवला आहे.

युवराजसिंह सोबतच मुंबई इंडियन्सने एविन लुईस, अ‍ॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ, ब्युरान हेंड्रिग्ज, बेन कटिंग, बरिंदर सरन, रसिक सलाम, पंकज जैस्वाल आणि अल्झारी जोसेफ यांना करारमुक्त केलं आहे. तर गेली काही वर्ष मुंबईच्या संघाचा भाग असलेल्या सिद्धेश लाडला मुंबईने कोलकात्याच्या ताफ्यात दिलं आहे. त्यामुळे आगामी हंगामात युवराजसिंह कोणत्या संघाकडून खेळताना दिसेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader